राजेंद्र शहापुरकर Jun 26, 2020
पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतील ( PMNRE )रक्कम राजीव गांधी फाऊंडेशन (RGF )कडे वळवल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. नड्डा यांनी कांग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधला आहे .संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमध्ये जमा झालेला निधी राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवण्यात आला .PMNRF च्या बोर्डावर कोण होते ? सोनिया गांधी होत्या त्यांनी नैतिकता खुंटीवर टांगली आणि पारदर्शकतेचा तर विचारही केला नाही असा हल्ला नड्डा यांनी चढवला आहे .